कृत्रिम बुद्धिमत्ता आणि धोरणात्मक आव्हाने
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटले की आजही एका पिढीला डोळ्यांसमोर येते ते टर्मिनेटर चित्रपटातले रोबोट्सचे दृश्य! स्वतःच्या अफाट ताकदीची जाणीव झाल्यानंतर मानवजातीचा संहार करायला निघालेला स्कायनेट आणि त्याने बनवलेले टर्मिनेटर हे आपल्या नेणिवेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भागच बनलेत जणू! भविष्यात कधीतरी वैज्ञानिक प्रगतीच्या एका टप्प्यावर संगणकांमध्ये स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता विकसित होईल, ‘स्व’ची जाणीव झालेले यंत्रमानव निर्माण …